*स्तुती आणि दोष*
आपले दोष नेहमी ऐका, पण स्तुती मात्र ऐकू नका
आपल्या वागण्या-बोलण्यातील दोष कोणी दाखवल्यास आपल्यात सुधारणा होण्याच्या दृष्टीने त्यांचे स्वागत करावे, पण कदाचित आपल्याला गर्व होईल म्हणून आपली स्तुती कोणी करीत असल्यास ती ऐकू नका.
मानवी स्वभावच असा आहे की त्याला आपले कोणी दोष दाखवल्यास वाईट वाटते व दाखवणाराचा राग येतो, पण हे योग्य नाही. आपले दोष दाखवणारा आपला हितचिंतक समजावा. आपले दोष आपल्याला जाणवत नाहीत, पण ते इतरांना जाणवतात. ते त्यांनी सांगितल्यास त्याप्रमाणे आपल्यात सुधारणा घडवून आणता येते. आपल्या प्रगतीच्या दृष्टीने हे फार चांगले असते.
पण आपली स्तुती आपल्या तोंडावर कोणी करीत असेल तर ती न ऐकणेच चांगले कारण तो आपली स्तुती का करीत आहे याचे खरे कारण कळत नाही. काही वेळेला आपला स्वार्थ साधण्यासाठी एखादी व्यक्ती आपली खोटी स्तुती आपल्याला ऐकवत असतो. दुसरे कारण अशी स्तुती ऐकायला माणसाला आवडते. स्तुतीला तो भाळतो आणि गविष्ठ होऊ लागतो. हे कटाक्षाने टाळावे. स्तुतीसाठी कामे करूच नयेत. म्हणूनच म्हणतात की, 'आपले दोष ऐका, स्तुती मात्र ऐकू नका.'
लेख आवडला तर नक्की शेअर करा 🙏🙏🙏🙏_
Very nice
उत्तर द्याहटवाNice artical
उत्तर द्याहटवा