महाराष्ट्रातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण १४ हजार ९५६ पदे भरली जाणार आहेत. ही भरती ३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. याबाबतची माहिती खालील लिंक वरती क्लिक करा policerecruitment2022.mahait.org
अटी व नियम
उमेदवाराला पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पद्धतीने policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा कालावधी : ३ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२
कोणताही उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू शकत नाहीत.
उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.
परीक्षा पद्धती
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये १०० पैकी ४० % गुण मिळवणे अनिवार्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏