साताऱ्यावर एक सुंदर कविता satara जिल्ह्याचे थोडक्या शब्दांत
सुंदर वर्णन केले आहे
पृथ्वीवरील एक तारा
नाव त्याचे सातारा
मावळती अजिंक्यतारा
उगवतीला कृष्णा माय
कोयनेची कोयना माय
जणू दुधावरची साय
महाबळेश्वर पाचगणी
थंड शितल दोघी जणी
राजधानी ही मराठ्यांची
शिव प्रभूंच्या वास्तव्याची
कास पठार अती सुंदर
जणू स्वर्गातली ती बाग
धोम उरमोडी उत्तर मांड
चाफळचा प्रभु श्री राम
सज्जनगड असे धाम
शिखर शिंगणापूरात शंभु
गोंदवलेकर सेवागिरी
यमाई मुधाई भवानी
सिद्धनाथ खंडोबा नागोबा
कळसुबाई आणि काळुबाई
पालीचा यळकोट खंडोबा
वाईचा ढोल्या गणपती
गडांचा गड प्रतापगड
वसंतगड महिमानगड
उंच धबधबा ठोसेघर
पवनचक्याचं आगर
देशसेवेत औवल आमुचा
शुरांचा जिल्हा सातारा
रांगडी भाषा सातारा
कणव बंधुता सातारा
स्त्रियांचा आदर सातारा
प्रिती संगम सातारा
डोंगर द-या सातारा
हिरवागार सातारा
बागाईत शेती सातारा
धुपती गुरं सातारा
दुष्काळ पडे नित्य असा
माणदेश सुद्धा सातारा
देशाची शान सातारा
मराठी बाणा सातारा
स्वातंत्य लढ्यात अग्रेसर
अभिमान आमुचा सातारा
आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏