डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेशातील तीरुत्तली या छोट्याशा गावामध्ये झाला. त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. त्यांचे बालपण तीरुत्तली व तिरुपती या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गेले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील मिशनरी शाळेमध्ये झाले. शालेय शिक्षण घेत असताना त्यांच्या असे लक्षात आले की मिशनरी शाळेमध्ये हिंदू धर्माची निंदा केली जाते. हिंदू धर्मामध्ये अस्पृश्यता, जातीयता, अंधश्रद्धा असे अनेक दोष आहेत. ते प्रारंभी दूर केले पाहिजेत. यासाठी वेद, उपनिषदे व गीता अशा विविध ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. अशी राधाकृष्णन यांची ठाम धारणा बनली आणि त्यांनी अभ्यासास सुरुवातही केली.
मद्रास येथील मिशनरी कॉलेजमध्ये 1905 साली तत्त्वज्ञान विषय घेऊन ते बी.ए. झाले. 1908 साली ते एम.ए. झाले. त्यांनी वेदांतील नीतीशास्त्र विषयावर निबंध लिहिला. प्रेसिडेन्सी विद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करू लागले. वास्तविक पाहता तत्त्वज्ञान अवघड विषय परंतु तो विद्यार्थ्यांना समजावा म्हणून अत्यंत सोप्या भाषेत ते शिकवत होते. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली. हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे यासंबंधी त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले. पाश्चात्यांनीसुद्धा त्यांच्या विचारांचा गौरव केला. आणि त्यांना ती आधुनिक ऋषी म्हणू लागले.डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन १९२६ साली इंग्लंडमध्ये आयोजित केलेल्या जागतिक तत्त्वज्ञान परिषदेला कलकत्ता विद्यापीठातर्फे गेले होते. तेथे त्यांनी आपल्या अमोघवाणीने हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान साऱ्या जगाला समजावून सांगितले.
ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना तीन वर्षासाठी प्राध्यापक म्हणून बोलावले. तेथे त्यांनी हिंदू जीवन पद्धतीचा दृष्टिकोन (हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ) या विषयावर विविध ठिकाणी व्याख्याने दिली. ही व्याख्याने अतिशय गाजली. अनेक वृत्तपत्रांनी यांचा गौरव केला. त्यामुळे इंग्लंडमध्ये अनेक ठिकाणी त्यांना व्याख्यानाची निमंत्रणे आली. भारतीय तत्त्वज्ञानातील उदात्त विचार तेथील लोकांना अतिशय आवडले .डॉक्टर राधाकृष्णन यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते .ते शांत चित्ताने आपला विषय श्रोत्यांना समजावून सांगत. 1936 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने स्पाल्डिग प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक केली.1931 साली ते आंध्र विद्यापीठाचे उपकुलगुरू झाले. आंध्र विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टररेट पदवी दिली. नंतर ते बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू झाले. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची जगात ख्याती झाली.
15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1952 साली भारताचे पहिले 'उपराष्ट्रपती' म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. 1957 मध्ये पुन्हा एकदा उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. भारतरत्न ही पदवी 1958 मध्ये दिली. 1962 साली भारताचे दुसरे 'राष्ट्रपती' म्हणून त्यांची निवड झाली. राष्ट्र संघामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काही वर्ष काम केले. ते काही काळ रशियाचे राजदूत होते.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार संपूर्ण जगात केला. हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान व प्रचलित हिंदू धर्मात असणारे दोष स्पष्ट केले. तत्त्वज्ञान विषय शिकविताना अत्यंत सोप्या भाषेचा उपयोग केला. विद्यार्थी प्रिय आणि आदर्श शिक्षक असलेल्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिन "शिक्षक दिन" म्हणून साजरा केला जातो. या महान पुरुषाचा मृत्यू 17 एप्रिल 1975 साली झाला.
जन्म 5 सप्टेंबर 1888 ला तीरुत्तनी दक्षिण भारतात तमिळनाडू येथे.
पूर्ण नाव ~ राधाकृष्णन विरस्वामी सर्वपल्ली
त्यांचे पूर्वज सर्वपल्ली या गावात राहत असत यावरून सर्वपल्ली हे नावासोबत जोडले गेले.
1896 ते 1900 पर्यंत तिरुपती येथे विद्यार्जन केले.
1900 ते 1904 पर्यंत वेल्लोर येथे शिक्षण घेतले.
1909 ला तत्त्वज्ञानात एम.ए. केले.
1909 ला मद्रास येथील कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक या पदी नियुक्त झाले.
1921 ला कलकत्ता विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक या पदी नियुक्ती. त्यांनी हिंदू धर्म, तत्त्वज्ञान, वेद ,उपनिषदे इत्यादी हिंदू शास्त्राचा गहण अभ्यास केला होता. आंध्र प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून 1931 ते 1936 कार्य केले.
1936 ला ऑक्सफर्ड विद्यापीठ इंग्लंड येथे प्राध्यापक पदी नियुक्ती.
बनारस हिंदू विद्यापीठाचे 1939 ते 1948 या दरम्यान कुलगुरूपदी कार्य केले.
घटना समितीचे सदस्य होते.
1949 ते 1952 भारताचे रशियामध्ये राजदूत.
1952 ते 1962 भारताचे उपराष्ट्रपती.
1962 ते 1967 भारताचे राष्ट्रपती.
त्यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर " शिक्षक दिन " म्हणून साजरा करतात.
" भारतरत्न " हा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना 1954 मध्ये प्रदान केला. लेखन दि हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ, फिलॉसॉपी ऑफ दि उपनिषदज, इंडियन फिलॉसॉफी, अ सोर्स बुक इन इंडियन फिलॉसॉफी, द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर, स्पिरिट ऑफ रिलीजन, सर्च ऑफ ट्रुथ, इ.
निधन 17 एप्रिल 1975 ला (मद्रास) चेन्नई येथे झाले.
🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏