*संघटनेत, सेवाभावी कार्यात नाराज होणे सोडा*
आपण सर्वजण विविध सार्वजनिक संस्थांमध्ये काम करीत असतो. आपल्यापैकी काहीजण संघटनेमध्ये अध्यक्ष/उपाध्यक्ष / सेक्रेटरी अशी मानाची पदे भूषवित असतो. खरं म्हणजे यांच्यासकट आपण सर्वजण त्या संस्थेचे विश्वस्त असतो. *पदाधिकारी ही एक व्यवस्था आहे.* आपल्या संस्थेचे आणि सर्वांचे उद्दिष्ट एकच असते. विविध विचारांचे पण एकाच ध्येयप्राप्तीसाठी आपण काम करीत असल्याने कार्यपूर्तीसाठी मतभेद तथा मनभेद होऊ नयेत ही अपेक्षा असते. यासाठीच काही पथ्ये आपण सर्वांनी मिळून पाळून यशाचे शिखर गाठुयात.
*संघटना, सेवा कार्य आणि नाराजी तिन्हीही एकत्र सोबत राहू शकत नाही....*
*मला त्यात काही मिळणार नव्हते, म्हणून मी नाही आलो.*
*मला पद नाही मिळाले, म्हणून मी नाही आलो.*
*माझं कोणी ऐकत नाही, म्हणून मी नाही आलो.*
*माझा कोणी सन्मान करीत नाही, म्हणून मी नाही आलो.*
*मला कोणी बोलायची संधी देत नाही, म्हणून मी नाही आलो.*
*वारंवार माझ्यावर आर्थिक बोजा पडतो, म्हणून मी नाही आलो.*
*सर्व कामाचा बोझा माझ्यावरच, म्हणून मी नाही आलो.*
*माझे विचार कोणीच मनावर घेत नाहीत, म्हणून मी नाही आलो.*
*मला कोणी साथ देत नाही (मदत करत नाही), म्हणून मी नाही आलो.*
*माझा गट वेगळा आहे, म्हणून मी नाही आलो.*
*आजकाल मला वेळ मिळत नाही, म्हणून मी नाही आलो.*
*मी नाही गेलो तर काय फरक पडणार आहे, जे व्हायचे ते होणार आहे.*
*खरं कार्य तेच आहे, की जे "संघटन हिताला" सर्वतोपरी स्थान देते आणि हे काही दुर्बलाचं काम नाही.*
जीवनात संसार, स्वार्थ, व्यवसाय आहे. त्यात अडीअडचणी, संघर्ष जरूर आहे; त्यातून वेळ काढत, बाहेर निघत *सेवाभावी संघटन कार्यात* सहभागी होऊयात. म्हणून जे लोक संघटन, सेवेत आपला मूल्यवान वेळ देत आहेत त्या लोकांना तन-मन-धनाने सहयोग देऊन, चांगल्या कार्याला पुढे नेऊया.
कारण हे लोक आपल्या कुटुंबातला व व्यवसायातला बहुमूल्य वेळ खर्च करत आपल्या समाजाला, संघटनेला व आपल्या पुढील पिढीला लाभ मिळावा यासाठी झिजत आहेत हे लक्षात घ्या.
*संघटित राहू, समस्या सोडवू, मार्ग काढून पुढे जाऊ आणि यशस्वीही होऊ !*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏