माझ्या वडिलांसोबत मी एक तासाचा काळ बँकेत घालवला कारण त्यांना काही पैसे ट्रान्सफर करायचे होते. मी स्वत: ला थांबवू करू शकलो नाही आणि विचारले ...
*"बाबा, आम्ही तुमची इंटरनेट बँकिंग activate का करीत नाही?"*
'' मी ते का करू? ''
बाबांनी विचारले...
'' मग, आपल्याला ट्रान्सफरसारख्या गोष्टींसाठी येथे एक तास घालवायची गरज नाही.
आपण आपली खरेदी ऑनलाइन देखील करू शकतो. सर्वकाही एकदम सोपे असेल! '
नेट बँकिंगच्या जगात त्यांना सामावून घेण्याबद्दल मी खूप उत्साहित होतो.
*बाबांनी विचारले, 'जर मी ते केले तर मला घरातून बाहेर पडायची आवश्यकता नाही?*
"हो, हो ''! मी बोललो. मी त्यांना सांगितले की आता घरपोच किरकोळ सामान देखील कसे पोहोचवतातआणि अमेझॉन कशाप्रकारे वितरीत करते!
*बाबांचे उत्तर ऐकून मात्र मी अवाक झालो, माझे बोलणेच थांबले*
ते म्हणाले, "आज मी या बँकेमध्ये प्रवेश केल्यानंतर, मी माझ्या *जुन्या चार मित्रांना भेटलो आहे,* मी बँकेतील अशा काही कर्मचार्यांबरोबर संवाद केला आहे जे आता मला चांगलेच ओळखतात व आपले समजतात.
*तुला माहित आहे की मी घरी कायम एकटाच असतो ...*
*मला छान तयार होऊन घराबाहेर पडण्यास, बँकेकडे येण्यास, इथल्या इतर ग्राहकांशी व स्टाफशी गप्पा मारायला, आवडते. आणि हे सगळं करण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ आहे... या प्रत्यक्ष बँकिंग मध्ये मला जिवंतपणा जाणवतो.*
दोन वर्षांपूर्वी मी आजारी पडलो, *स्टोअरचा मालक ज्याच्याकडून मी फळ खरेदी करतो, मला भेटायला आला आणि माझ्या बिछान्याशी बसून रडला.*
*काही वर्षापूर्वी जेव्हा तूझी आई वॉक करतांना पडली तेव्हा आमच्या स्थानिक दुकानदाराने तिला पाहिले आणि तिला ताबडतोब आपल्या घरी घेऊन आला,* कारण त्याला माहित आहे की मी कोठे राहतो.
जर सर्व काही ऑनलाइन झाले तर माझ्याकडे हा *'मानवी' स्पर्श आणि भावना असतील ?*
मी स्वतःला फक्त घर आणि कॉम्पुटर/मोबाईल यामध्ये कैद करून घ्यायचे आहे का?
*आज मी ज्या व्यक्तीशी व्यवहार करीत आहे ती मला माहित आहे आणि आमचे संबंध फक्त ग्राहक व 'विक्रेता' एवढेच नाहीत तर त्यात भावनिक बंध आहे
ऑनलाईन कंपनी अमेझॉन सर्व काही देऊ शकते का? ''
*बाळा केवळ तंत्रज्ञान हे जीवन नाही .. आवश्यक असेल तिथे तंत्रज्ञान नक्कीच वापर मात्र आपले प्रियजन, मित्र-मैत्रिणी व अन्य लोकांसाठी सुद्धा वेळ दे !*
🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏