*शरद पवार इनस्पायर फेलोशिपची घोषणा*
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने 'शरद पवार इनस्पायर फेलोशीप'ची सुरुवात गेल्या वर्षी करण्यात आली आहे.
याअंतर्गत कृषी (‘Sharad Pawar Inspire Fellowship in Agriculture'), साहित्य ('Sharad Pawar Inspire Fellowship in Literature’) आणि शिक्षण (‘Sharad Pawar Inspire Fellowship in Education’) या क्षेत्रातील युवा पिढीतील गुणवंतांना आप आपल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजविण्याची संधी दिली जाते. आज आंतरराष्ट्रीय युवा दिनी 'शरद पवार इनस्पायर फेलोशीपच्या निमंत्रक’ सुप्रिया सुळे यांनी २०२३ च्या फेलोशिपची घोषणा केली.
'शरद पवार इनस्पायर फेलोशीप' दर वर्षी कृषि क्षेत्रात ८०, शिक्षण क्षेत्रात ४० आणि साहित्य क्षेत्रात १० युअवक युवतीना दिली जाते. www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील फेलोशीपसाठी दिनांक १२ ऑगस्ट २०२२ पासून ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करता येतील. अर्ज करण्याची मुदत १२ ऑक्टोबर २०२२ पर्यन्त आहे. तीनही क्षेत्रातील फेलोशिपसाठी तज्ञ परीक्षकांच्या तीन निवड समिति तयार करण्यात आलेल्या आहेत. १२ ऑक्टोबर पर्यन्त येणाऱ्या अर्जाची छाननी निवड समिति करेल. ०३ नोव्हेंबर पर्यन्त फेलोशिपसाठी पात्र उमेदवारांची नावे निश्चित होतील. या नावांची घोषणा ११ नोव्हेंबर २०२२ रोजी केली जाईल.
२०२३ साठी निवडलेल्या फेलोजना ११ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात मा. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत फेलोशिप प्रदान करण्यात येईल. 'शरद पवार इनस्पायर फेलोशीप' ही एका वर्षासाठी असून, निवड झालेल्या फेलोजनी निश्चित केलेल्या विषयावर एक वर्षाच्या अवधीत आपला प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित आहे. तिन्ही फेलोशिपचे अर्ज, फेलोशिप बाबतची संपूर्ण माहिती आणि वार्षिक वेळापत्रक फेलोशिपच्या www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.
"शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन एज्युकेशन " साठी एकूण ४० शिक्षकांना प्राथमिक २०,माध्यमिक २० शिक्षकांना ही फेलोशिप देण्यात येणार आहे.आपापल्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यार्या शिक्षकांना प्रोत्साहन देणे आणि त्याच्या उपक्रमास व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे.जिल्हा परिषद शिक्षक,शासकीय मान्यताप्राप्त असलेल्या संस्थेतील शिक्षक या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात.
महाराष्ट्रातील युवक युवतीनी नोंदणी करण्यापूर्वी वेब साईट वरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज व प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏