- विविध प्रकारच्या वस्तू अथवा प्राणी यांच्या समूहाचा बोध होण्यासाठी त्याला विशिष्ट नाव दिले जाते त्या समुदर्शक शब्द असे म्हणतात.
- क्रमांक समुहदर्शक शब्द
- १ ढगांचा घनमंडल
- २ फळांचा घोस
- ३ मुलींचा घोळका
- ४ नारळांचा ढीग
- ५. साधूंचा. जथा
- ६ गवताची गंजी, पेंढी
- ७ पोळयांची चवड, चळत
- ८ दुर्वांची जुडी
- ९ घरांची चाळ
- १० पालेभाजीची गड्डी, जुडी
- ११ केसांचा झुबका, पुंजका
- १२ वानरांची टोळी
- १३ वेलींचा कुंज
- १४ वाळूचा, विटांचा ढीग
- १५ केसांची बट, जट
- १६ सैनिकांची तुकडी , पथक , पलटण
- १७ जहाजांचा काफिला
- १८ प्रश्नपत्रिकांचा संच
- १९ मडक्यांची उतरंड
- २० गवताची पेंढी,भारा,गंजी
- २१ कलिंगडाचा ढीग
- २२ माणसांचा जमाव
- २३ गुरांचा कळप
- २४ यात्रेकरूंची जत्रा
- २५ लमाणांचा, उंटांचा तांडा
- २६ तारकांचा पुंज
- २७ द्राक्ष्यांचा घड,घोस
- २८ उतारूंची झुंड, झुंबड
- २९ महिलांचे मंडळ
- ३० धान्याची रास
- ३१ नाण्यांची चळत
- ३२ केळ्यांचा घड, लोंगर
- ३३ लाकडाची,उसाची. मोळी
- ३४ विमानांचा ताफा
- ३५ हत्तींचा,हरीणांचा कळप
- ३६ वाद्यांचा वृंद
- ३७ ताऱ्यांचा पुंजका
- ३८ आंब्याच्या झाडाची आमराई
- ३९ पोत्यांची थप्पी
- ४० उपकरणांचा संच
- ४१ काजूंची,माशांची गाथण
- ४२ किल्ल्यांचा जुडगा
- ४३ मुलांचा चमू , घोळका
- ४४ नोटांचे पुडके
- ४५ वाघाचा. वृंद
- ४६ गाईगुरांचे खिल्लार
- ४७ चोरांची, दरोडेखोरांची टोळी
- ४८ आंब्यांची राई
- ४९ प्रवाशांची झुंबड
- ५० करवंदांची जाळी
- ५१ बांबूचे बेट
- ५२ खेळाडूंचा फुलांचा संघ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏