मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

सोमवार, २५ जुलै, २०२२

विद्यार्जन...

 तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगातील प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य गतिमान झाले आहे . मध्ये शाळेतील विद्यार्थी सुद्धा अपवाद नाही

आपल्याकडे विद्यार्थी हा शब्द शिकणाऱ्या व्यक्तीसाठी, मुला-मुलींसाठी वापरला जातो. विद्यार्थी या शब्दाचा अर्थ खूप महत्त्वाचा आणि शिक्षणाला दिशा दर्शक आहे. विद्यार्थी म्हणजे जो विद्येचं अर्जन करतो तो.अर्जन करणे म्हणजे शोधणे, प्रयत्नपूर्वक मिळवणे, ग्रहण करणे असा होतो. याचाच दुसरा अर्थ असा कि विद्यार्थ्याला ज्ञानाची ओढ असली पाहिजे तरच तो ते मिळवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी कष्ट घेईल. असं प्रयत्नपूर्वक मिळवलेलं ज्ञान त्याला सगळ्यात जास्त उपयुक्त ठरेल. प्रयत्नपूर्वक मिळल ज्ञान त्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती उपयोगी पडेल.


आताच्या शिक्षणपद्धतीत , विद्यार्थी असण्याचा हा अर्थ आपण विसरलो तर नाही ना  अशी शंका येते याला कारण मुलांची अभ्यासाबद्दलची उदासीनता, पालकांचा गुणांवर असणारा भर, इतर विद्यार्थ्यांशी तुलना आणि सगळं आयतं तयार करून मुलांना भरवणारी बाजारातली अनेक उपलब्ध साधनं. साधा एखादा प्रकल्प करून न्यायचा असेल किंवा शाळेत करायचा असेल तरीही बाजारातून तयार मिळणाऱ्या गोष्टी आणण्या कडे पालकांचा  सुद्धा कल असतो. मुलांना थोडे सुद्धा कष्ट पडू नयेत यासाठी सगळे अगदी तत्पर असतात. आपल्याकडे समस्या यायच्या अगोदर बाजारात त्याची अनेक उत्तरे, पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध असतं,  त्यामुळे विद्यार्थी हा विद्यार्थी न राहता ग्राहक झाला आहे. 


या सगळ्यात एका  गोष्टीकडे सहज दुर्लक्ष होतं ती म्हणजे मुलांचा ज्ञान मिळवण्यासाठीचा  संघर्ष, त्यांची ज्ञान लालसा वाढवण्याचा प्रयत्न. संघर्ष ही विकासाची महत्त्वाची पायरी आहे. तो संघर्षाचा भाग काढून घेऊन आपण अगदी कणाहीन, दुबळी, परावलंबी अशी पिढी तयार करतोय. जिथे संघर्ष नाही तिथे उत्तम विकास संभवतच नाही.  ज्ञानासाठी कष्ट  घेण्याची तयारी जितकी जास्त तितकं ज्ञान अधिक गाढ आणि खोलवर रुजलेलं. विद्यार्थ्यांना प्रत्येक कृती स्वतः करायला लावणं हेच खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये गुणांची पारख केली पाहिजे, सुप्त कलागुणांना वाव दिला पाहिजे, परीक्षेतीलमार्क पेक्षा गुणांची कदर झाली पाहिजे 

भविष्यकाळात जर आपल्याला उत्तम तत्त्वचिंतक, समाज सुधारक,  उद्योगपती , शास्त्रज्ञ आणि कलाकार हवे असतील तर विद्यार्थी खरोखर विद्येचं अर्जन करणारे कसे बनतील यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. 

विजयकुमार किसन भुजबळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट