*मुलांवर योग्य संस्कार करा.....*
*1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा...!
*2. घरात मुलांसमोर आदळ-आपट, भांडणे करू नका...!
*3. रोज एक चांगले काम करण्याची सवय लावा, त्याबद्दल दररोज घरात मुलांसमक्ष चर्चा करा...!
*4. मुलांना नेहमी अपमानास्पद बोलू नका, मूल तुम्हाला टाळणे चालू करेल...!
*5. मुलाने चूक केल्यास त्याला चांगल्या पद्धतीने चूक समजाऊन सांगा व माफ करा, त्याने चांगले काम केले असेल तर त्याचे तोंड भरून कौतुक करा...!
*6.मुलांसाठी आई-बाबांकडे काही वेळ असावा...!
*7. आईसाठी व आजी-आजोबांसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या-छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे..!
*8. मूले ही कुटुंबाची समाजात आदर्श व्हावीत असे त्यांच्यावर संस्कार करा, आपल्या भविष्याची सोय नाहीत, म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका...!
*9. मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका...!!
*10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या, मूल कितीही लहान असेल तरी...!
*11. आपण मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा...!
*12. आपल्या मुलांच्या प्राथमिक गरजा समजून घ्या...!
*13. मुलांच्या प्रश्नांना समर्पक व वैज्ञानिक दृष्टीने उत्तरे द्या. त्यांची प्रश्ने टाळू नका...!
*14. श्रध्दा व अंध-श्रध्दा यांतील फरक मुलांना समजावून सांगा...!
*15. शाळेत जाण्यापुर्वी मुलांना लहानपणीच मोबाईल खेळणे म्हणून देऊ नये. त्याचे दुष्परिणाम होतात, शिक्षणासाठी आवश्यकते वेळी संगणक, लॅपटाॅप ई. ची व्यवस्था करावी...!
*16. मुलांना घराबाहेर मैदानी खेळ खेळण्याची सवय लावावी. अपयश व पराभव सहन करता आला पाहीजे...!
*17. मुलांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण करावी...!
*18. मुलाची प्रत्येक अवास्तव मागणी सर्रासपणे पूर्ण करू नये. त्यांना नकाराची सवय लावावी...!
*19.मुलांच्यावर चांगले संस्कार करावे, ईतरांचा मान-सन्मान करणे, अदबीने बोलणे शिकवावे, भाषा चांगली असावी...!
*20. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना पालक म्हणून घरी या...!
*21. मुलांशी कधीही नकारात्मक-दृष्ट्या बोलू नये...!
*22.सज्ञानी मुलास नालायक, गाढव, मूर्ख ई. अपमानकारक शब्द वापरू नये...!
*23. मुलांना लहान बाळ वयातआपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो, पण विशेषत: जन्मदात्या आईचे सुयोग्य संस्कार हवेत,परंतु मुलांना काही प्रमाणात रिस्क घेऊ द्यावी...!
*24. मुलांना प्रेमाने धाक हा असावा परंतु त्यास अमाणुषपणे मारणे अत्यंत चुकीचे आहे, त्यामुळे मूले खोटे बोलायला लागतात... असे प्रेमापोटी देखील मारू नये...!
*25. तू जर हे केलस तर मी सोडून जाईन, तुला एकटे सोडून देईल असे मुलांशी कधीही बोलू नये...!
*26. मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या वर्तनाचे कौतुक करावे...!
*27. यशस्वी लोकांबाबत घरात नेहमी चर्चा करावी...!
*28. मुलांच्या प्रगती-पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप असावा...!
*29. समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांबाबत मुलांशी चर्चा करा, हत्या, आत्महत्या, हिंसा, ई. कशा वाईट आहेत हे समजावून सांगा...!
*30. मुलांचे मित्र, मैत्रीणी कोण आहेत?, त्यांचेशी पण संवाद असू द्या...!
*31.मुलांना इतरांच्या खोट्या संशयखोर प्रेम कहाण्या घरात नेहमी सांगू नका.घरात नेहमीच अशाप्रकारचे विषय होत असतील तर त्यामुळे मुलं तसे लवकर अनुकरण करुन तशी वागतात...!
*32.संस्कार मुलांना पाटीवर किंवा वहीवर लिहून देऊन पाट करायला सांगून घडवता येत नाही हे आपणां सर्वांना माहितच आहे .आपण जसे आचरण करतो तसे संस्कार मुलांच्यावर घडत असतात. आई-वडील जसे वागतात तसे आई-वडिलांचे अनुकरण करुन मुलं तशी वागतात.म्हणुन मुलांसमोर चांगले आचरण ठेवा...!
*33.संस्कार दररोज आपल्या घरात व परिसरात होत असलेल्या घटनांनुसार घडत असतात. त्यासाठी वेळोवेळी मुलांना चांगले काय - वाईट काय सांगून आई वडिलांनी मार्गदर्शकची भुमिका निभावने आवश्यक आहे...!
*34.मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष पुरवा, आवशकते नुसार तज्ञांचा सल्ला घ्यावा...!
*35.आपल्या मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हा हे कायमच लक्षात ठेवा व त्याप्रमाणे त्यांच्यावर चांगले योग्य संस्कार करीत राहा, त्यांना चांगल्या कामात प्रोत्साहन द्या, त्यांची हिम्मत व उमेद वाढवा, त्यांना आत्मनिर्भय बनवा, कुटुंबाचे, समाजाचे व गावाचे नाव लौकिक वाढविण्यासाठी त्यांना प्रेरणा द्या...!
*आपला जिव्हाळा कायम राहो*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏