मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

शनिवार, १४ मे, २०२२

आऊट...लेट OUTLET

 *आऊटलेट..*✍️✍️


*ट्रेस म्हणजे काय?*

*तो का येतो?*

*तो घ्यायचा कशासाठी?*

*तो घेतल्याने समस्या कमी होतात का?*

*त्याच्यामुळे आपण स्वत; सोबत इतरांनाही* *संकटात लोटतो त्याचे काय?*

*घर, खानदान, सामाजिक प्रतिष्ठा, भौतिक सुख साधने, प्रेमप्रकरणे, लफडी, एकमेकांशी असहकार, ऐय्याशी, मौजमजा म्हणजे जीवन आहे का..?*

*नक्कीच नाही..*


जे काही प्रमाणात होते, हातून घडून जाते ते जगण्याचा तत्कालीन भाग म्हणून वेळीच सोडून द्यायला हवा. ते मर्दुमकी किंवा कर्तृत्व म्हणून मिरवत बसावे का? ते सोडून जगण्यासाठी आयुष्य पडलेले आहे. स्वतःहून सोडविल्या शिवाय कोणतीही समस्या सुटणार नाही. सुटतच नाही. आंजरणारे-गोंजरणारे काही काळाने डोळेझाक करतात. कलटी मारून निघून जातात. सगळे सोसायचे आपल्याला असते. वाट्याचे भोग भोगायचेही स्वतःलाच असतात..!


स्वतःसाठी जगण्यापेक्षा आपले राहणीमान इतरांना दाखविण्यासाठी जगले जाते. जिथे उणेपणा येतो. कधीकधी फजिती होते तेव्हा तणाव येतो. मानसिक आरोग्य बिघडते. माणूस इतरांशी स्पर्धा करायला लागतो आणि स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. बदलत्या परिस्थितीत जुळवून घेता आले नाहीतर मनाची घालमेल होते. चिंता वाढतात. झोप परागंदा होते. दिवसापेक्षा रात्री भितीदायक वाटू लागतात. या सगळ्यांवर मार्ग काय? तो कुठून बॅंकेचे ठेवीवरील व्याज येते तसे येणार नाही. बारकाईने विचार केल्यास मार्ग स्वतःजवळ असतो..!


हरीण सुगंधी कस्तुरीच्या वासाने बेफाम होऊन कस्तुरीसाठी पळ..पळ.. पळते; पण त्याला शेवटपर्यंत पत्ता लागत नाही कस्तुरी आहे कुठे? ते दमते, थकते, कंटाळून जाते आणि एका ठिकाणी गप्प बसते. त्याचे पर्याय संपतात. पर्याय संपले की, माणूस संधी निर्माण होईपर्यंत गप्प बसतो. हरीणही तसेच गप्प बसते. त्याची झोप लागते. झोपेतून उठल्यावरही कस्तुरीचा सुगंध हरणाला छळतो. ते कावरे बावरे होते. कस्तुरी त्याच्या बेंबीत असते हे त्याला शेवटपर्यंत समजत नाही. आपल्या प्रत्येकाचेही तसेच आहे. निरर्थक वादाला, कटू संवादाला बगल देऊन पुढे जाता आले तर जगणे आनंददायी होईल आणि समस्या विरघळून जातील..!


कोणाच्या हातचे खेळणे होण्याअगोदर त्याच्यापासून, तिच्यापासून दूर जावे. रोखठोक वागण्यामूळे काही काळ मनात कडवटपणा येईल, काही काळ राहील नंतर ज्याच्या- त्याच्या मार्गाने सगळे विसरून निघून जातील. या कलियुगात काही गोष्टी, घटना, प्रसंग विसरून जाणारा सुखी होतो तर लक्षात ठेवणारा आठवणी चघळत बसतो. आयुष्यात काही गोष्टींची गरज असते तर काही गोष्टी लांब असलेल्या चांगले असते. निवडायचे काय अन् टाळायचे काय हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे. फक्त सद्सद्विवेक जागा असेल तर निर्णय चुकत नाही. निर्णय ठाम असेल तर तो चुकला तरी त्याचा मार्ग अपयशातून यशाकडे पळ काढतो..!


साने गुरुजी, भैय्यू महाराज, जेष्ठ समाजसेवक बाबा आमटेंची नात डॉ. शितल आमटे-करकजी ही मोठ्या नावांची भली मोठी यादी आहे. इति पासून अंतापर्यंत असेल..

काय असेल तणाव?

तो का येत असेल?

ह्या नामांकित व्यक्ती त्यामधून मार्ग काढण्यापेक्षा आपल्या जीवनाचा अंत का करून घेतात?

हे सारे प्रश्न एकाच प्रश्नापाशी येऊन थांबतात. सांगायचे कोणाला?

व्यक्त व्हायचे कोणापाशी?

आपल्या समाजातील स्थानाला तर धक्का बसणार नाही ना?

जीवन अन् मरण या संघर्षात मरण जवळ केले जाते. समाजाला दिशादर्शक, समाजाचे आधारस्तंभ अशा पध्दतीने निखळणे ही समाजाची कधीही न भरून येणारी हानी आहे. जागृत पालकांनी आपल्या मुलांना मोठे करताना याचा जरूर विचार करावा..!


*विचारांचे आदानप्रदान करणारी 'आऊटलेट' असेल तर प्रश्न निर्माण होणार नाहीत.  'आऊटलेट' ही प्रत्येक माणसाला आपले जीवन अव्याहतपणे जगण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिबंधक लस आहे..!*


*शुभसकाळ*💐👍

*१४ मे २०२२*

*राजेंद्र बोबडे, सातारा*

*(YR...)*

*9822916788*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट