*तुम्ही तुमचे आयुष्य कसे जगता?*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*आयुष्यावर बोलू काही,जमलं तर राज खोलू काही.*
म्हटलं तर जगणं सोपं आहे, म्हटलं तर सर्वात कठिण आहे. दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. एखाद्या बॉल वर सिक्स मारावी तर एखादया बॉल वर क्लीन बोल्ड. सगळ्या गोष्टी मना सारख्या घडत नसतात. आणि त्या का घडाव्यात? ज्याला पाण्यात पोहता येत नाही तो पाण्याला घाबरतो आणि ज्याला मस्त पोहता आले तो तासनतास पोहत रहातो, आनंद घेत असतो. हात पाय न हलवता स्थिर राहुन उताणा पडून मस्त मजा घेत असतो. तसेच ह्या आयुष्याचे आहे .
आयुष्य म्हणजे एक स्पर्धा आहे असे ज्याला वाटते त्याच्या डोक्यात भूसा भरला आहे असे वाटते . आयुष्य म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे असे ज्याला वाटते त्याच्या डोक्यात नक्कीच प्रकाश पडला आहे. तोच खरा शहाणा आहे. ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान असो वा विज्ञान असो किवा रोजच्या धकाधकीच्या जीवनात बिकट प्रसंगाला तोंड कसे द्यावे हे असो. एखादा पशू संकटात सापडला तर त्याची बुध्दी वापरून त्यावर मात करतो. हेच ते खरे ज्ञान होय.
खा ,पी ,मजा कर हे कोणाचे नाव नाही. ही आहे सुखी जीवनाची गुरुकील्ली . जगा आणि जगू द्या हा आहे गुरुमंत्र. रडायचे ते येताना, त्यानंतर रडण्याची पाळी इतरांची ते आपण जाताना हे ध्येय ठेऊन आयुष्याची काळक्रमणा असावी. शरीर आणि मन नेहमी व्यस्त असावे म्हणजे बऱ्याच नको त्या गोष्टिंपासुन सुटका होते. जगाचा भार आपल्यावर आहे अशी समजूत करून जो वागतो त्याला आयुष्य काय आहे हे बहुदा कळालेले नसते. आकाशात असंख्य तारे आहेत, समुद्रात असंख्य जलचर आहेत तसेच ह्या पृथ्वीवर आपण आहोत हे ध्यानात घेतले पाहिजे तरच तो जगला.
एखादया जत्रेत गेल्यावर भांबावून न जाता प्रत्येक गोष्टीत आनंद घेत घेत हिंडायचे असते. खिशात जर पैसे असतिल तर भेळ खात आइस्क्रीमचा गोळा चोखत मस्त धुंदीत सगळं विसरुन संध्याकाळ पर्यंत नुसती धमाल भटकंती. असेच ह्या आयुष्याचे आहे जे आहे त्यात समाधान मानून घ्यायला हवे. आयुष्याची पहाट उजाडली की तिची संध्याकाळ होणार आहे हा भरवसा ठेवला पाहिजे.
निसर्ग मानवाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी प्रयत्नशील आहे. मानवाने त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर,वळणावर संधी शोधून तिला यशस्वी करणाराच खरा शहाणा माणूस असतो. ह्या अफाट आकाशात पक्षी सुध्दा त्याच्या इवल्याशा पंखानी चारा शोधतो आणि जगतो मग मानवाला अयुष्य कसे जगावे हा प्रश्न पडला तर त्या निसर्गाला खाली मान घालवी लागेल.
💐💐💐💐💐💐💐💐
शुभं भवतु
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
अजित राक्षे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏