*तुलना*
श्वेताने एका तासात १० KM अंतर कापले. आकाशने तेच अंतर दीड तासात पूर्ण केले.
दोघां पैकी तंदुरुस्त कोण ?
किंवा
कोणाचा फिटनेस चांगला ?
अर्थात सर्वांचे उत्तर *श्वेता* असेल.
श्वेताने हे अंतर तयार केलेल्या ट्रॅकवर पूर्ण केले तर आकाशाने दगड-मातीच्या वाटेने चालत असे म्हटले तर ???
मग सर्वांचे उत्तर *आकाश* असेल.
पण जेव्हा आम्हाला कळले की *श्वेता ५०* वर्षांची आहे तर *आकाश २५* वर्षांचा आहे ??
मग सर्वांचे उत्तर पुन्हा *श्वेता* असेल.
पण आम्हाला हे देखील कळले की आकाशचे वजन तब्बल *१४०* किलो आहे तर श्वेताचे वजन *६५* किलो आहे.
पुन्हा सर्वांचे उत्तर *आकाश* असेल
जसे आपण आकाश आणि श्वेता बद्दल अधिकाधीक माहिती मिळवतो, तसे तसे कोण चांगले आहे याबद्दल आपली *मते भिन्न* होतात आणि *निर्णय बदलतात.*
जीवनाचे वास्तवही असेच आहे.
आपण प्रत्येकाबद्दल खूप वरवर आणि घाईने आपले *मत* तयार करतो,
ज्यामुळे आपण स्वतःला आणि इतरांना *न्याय* देऊ शकत नाही.
प्रत्येकाला वेगवेगळ्या *संधी* मिळतात.
प्रत्येकाचे *आयुष्य वेगळे* आहे.
प्रत्येकाची *साधन-संपत्ती भिन्न* आहे.
प्रत्येकाच्या *समस्या* वेगवेगळ्या आहेत.
प्रत्येकाचे *उपाय* वेगवेगळे आहेत.
प्रत्येकाची *विचारसरणी* वेगळी आहे.
*म्हणूनच*
*प्रत्येकाने आपल्या आरोग्याची, संपत्तीची, परिस्थितीची अथवा जीवनाची श्रेष्ठता कोणाशी _तुलना_ करण्यात नाही*
*तर*
*स्वतःची परीक्षा घेण्यामध्ये आहे.*
*आपण सर्वोत्तम आहोत,*
*आपण जसे आहोत तसेच रहावे*
*आणि*
*आपल्या परिस्थितीनुसार सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करत राहावे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏