*कर्माचा सिद्धांत*
आई बाबांशी कसं वागतो आपण!
😊😊😊😊😊😊😊😊
कोणतीही स्त्री किंवा पुरुष ज्यांचं वय वर्षे साठ अथवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना जेष्ठ नागरिक असे संबोधण्यात येते . साधारणपणे या वयात माणसाला मानसिक व शारीरिक थकवा येत असतो .शरीर साथ देण्यास हळूहळू असमर्थ ठरू लागते. त्यामुळे थोडीशी चिडचिड हटवादीपणा वाढतो . म्हातारपण म्हणजे कळत्या वयातील एक बालपण असते.
आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना एकाकी व नीरस आयुष्य जगावे लागत आहे .सामाजिक सुरक्षितता नाही . काही कौटुंबिक अत्याचाराने पिडीत आहेत . काही लोक आजही एकाकी जीवन जगत आहेत . प्राण्यांच्याही वाट्याला येऊ नये असे हलाखीचे दीनवाणे जीवन कित्येकांच्या वाट्याला येताना दिसत आहे . विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समाजात ‘आम्ही अन आमची मुले” एवढा संकुचित दृष्टिकोन निर्माण झाला आहे . त्यांना घरातील म्हातारी माणसं म्हणजे एक अडगळ वाटतात किंवा त्यांच्या संसारातील अडसर वाटू लागतात . ही विचारसरणी दिवसेंदिवस मूळ धरू लागली आहे.
आजकालच्या मुलांना आजी-आजोबांचा सहवास मिळत नाही त्यामुळे त्यांच्यावर संस्कार तरी कसे होणार? शहरीकरणाच्या ठिकाणी जागेअभावी किंवा महागाईमुळे आई-वडिलांना गावी पाठवले जाते . कामानिमित्त दिवसभर बाहेर असलेले आई-वडील मुलांवर संस्कार कधी करणार ? त्यांना पुराणातील बोधकथा , संस्कार कथा कोण सांगणार ?
आज वृद्धाश्रमांची संख्या वाढणे हे कशाचे द्योतक आहे ? का आई-वडिलांना मुलेबाळे असूनही वृद्धाश्रमांमध्ये जीवन व्यथीत करावे लागते ? का त्यांचे थकलेले डोळे आजही निमिषात पाहून कुणीतरी आपला येईल म्हणून वाट पाहत असतात ? या सगळ्याच्या मुळाशी आजची कुटुंब पद्धती आहे.
जीवनामध्ये आपण संस्कारांना तिलांजली दिलेली आहे. तोही एक जीव आहे याचा आपल्याला विसर पडला आहे. आपल्या आई-वडिलांना आपण जशी वागणूक देतो तशी प्रेमाची वागणूक सासू-सासऱ्यांना का मिळू नये ? सर्रासपणे १५ टक्के स्त्रिया सोडल्या तर इतरांच्या मनात मत्सराची भावना अधिक दिसते. लग्नानंतर पती एवढे हतबल का होतात ? का त्यांना मातेच्या पान्हयाचा विसर पडतो ? का त्यांना आई वडिलांच्या काळजातील वेदना जाणवत नाहीत ? एवढी स्वार्थी कशी काय मुलं होऊ शकतात ?
शेवटी पेराल तसे उगवाल . मुलं नेहमी अनुकरण करत असतात. आपणही कधीतरी म्हातारे होणार आणि त्यावेळी आपल्या मुलांनी आपल्याला वृद्धाश्रमाची वाट दाखवली तर त्यात त्यांचं काय चुकलं ? म्हणून अजुनही वेळ गेली नाही . वेळीच सावध व्हा. शासनाने सेवा ज्येष्ठांसाठी कित्येक धोरणे , योजना आखल्या परंतु कार्यालयाच्या पायऱ्या झिजवून पदरी निराशाच पडते . कुणीही पोटतिडकीने माईचा लाल शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढे सरसावत नाहीये .
*इतकी का माणुसकी मेलेली आहे ?*
थोडासा विचार करू, आणि बदल घडवू.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शुभं भवतु
क्रमशः
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
अजित राक्षे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏