मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

राग नियंत्रण

 💐रागावर नियंत्रण करण्याचे

एक सुंदर उदाहरण --💐


*एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* -


"नेहमीप्रमाणे बसलो होतो.

 एक पक्षकार आले. 

हातात कागदाची पिशवी.

 रापलेला चेहरा. 

वाढलेली दाढी.

 मळलेली कपडे.

 म्हणाले.., 

" सगळ्या च जमीनीवर स्टे 

लावायचा आहे. आणखी काय 

कागदं पाहीजेत? 

किती खर्च येईल? "


मी त्यांना बसायला सांगितलं. 

ते खुर्चीवर बसले. 

त्यांची सर्व कागदपत्रे तपासली.

 त्यांच्या कडून माहीती घेतली. 

अर्धा पाउण तास गेला.

 मी त्यांना सांगितलं. ,

" मी अजून कागदपत्रे पाहतो.

 तुमच्या केसचा विचार करूया. 

तुंम्ही असं करा

 ४ दिवसांनी परत या. "


४ दिवसांनी ते पक्षकार

 पुन्हा आले.

 तसाच अवतार. 

भावा बद्दलचा राग अजूनही

 कमी झाला नव्हता.

मी त्यांना बसायची खूण केली.

 ते बसले. 


मग मीच बोलायला सुरूवात 

केली. 

" मी तुमची कागदपत्रे पाहीली.

तुम्ही दोघे भाऊ. 

एक बहीण. 

आई वडील लहानपणीच गेले.

 तुमच शिक्षण ९ वी पास.

 धाकला भाऊ M.A.B.ed.

 तुंम्ही भावाच्या शिक्षणा साठी

 शाळा सोडली.

 रानात लंगोटी वर राबला.

 नेवरा दाजी च्या विहीरीवर 

दगड फोडली.

 सदाबापू च्या उसात

 च-या पाडल्या. 

पण भावाच्या शिक्षणाला पैसा 

कमी पडू दिला नाही. 

एकदा बहीण शेतात गुरं

 चारत होती.

 तुमचा भाऊ शाळेतून आला होता.

 कसा तो म्हशीच्या आडवा गेला

 आणि त्याला  शिंग लागली संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं.

 तुंम्ही खांद्या वरून त्याला

 बोरगावला नेलं.

 खरं म्हणजे त्यावेळी तुमचं 

पण कळतं वय नव्हतं....


फक्त कळती माया होती..


 आई बापाच्या मागं यांचा मीच

 आई बाप ही भावना होती...

तुमचा भाऊ B.A ला गेला.

 उर भरून आला.

 तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट

 उपसायला लागला. 

पण अचानक त्याला किडनीचा

 त्रास सुरू झाला.

 दवाखानं केल..

बाहेरचं केलं..

पण गुण आला नाही..

शेवटी डॉक्टर नं किडनी काढायला

 सांगितली.

तुंम्ही तुमची किडनी दिली.

ऑफिसर झाल्यावर खुप

 फिरायच आहे..

नोकरी करायची आहे..

तुला आमच्या पेक्षा लय त्रास.. 


आंम्ही रानातली माणसं.

 आंम्हाला एक किडनी असली 

तरी चालतय.

तुम्ही बायकोच सुध्दा न

 ऐकता किडनी दिली.


भाऊ M.A ला गेला.

 होस्टेल वर रहायला गेला.

 गावात मटण पडलं..

डबा नेवून द्यावा.

 शेतात कणसं आली..

कणस नेवून द्यावी. 

कुठला सण आला..

पोळ्यांचा डबा द्यावा..

घरा पासून हॉस्टेल च अंतर 

२५ की.मी. 

पण तुंम्ही सायकलने गेला.

 घासातला घास घातला.

भावाला नोकरी लागली..

 तुंम्ही गावात साखर वाटली..


३ वर्षीपुर्वी त्याचं लग्न झालं ..

झालं म्हणजे त्यानंच केलं.

 तुंम्ही फक्त हजर होता. पण

 तरी अभिमान होता..


भावाला नोकरी लागली.

 भावाच लग्न झालं..

आता तुम्हाला आणि बायका पोरांना 

सुख लागणार होतं;

 पण झाल उलटंच....

लग्न झाल्या पासुन भाऊ घरी

 येत नाही..

बोलावलं तर म्हणतो; 

मी बायकोला शब्द दिलाय..

 घरी पैसा देत नाही..

विचारलं तर म्हणतो अंगावर 

कर्ज आहे..

 गेल्या वर्षी कोल्हापुरा त फ्लॅट

 घेतला. 

विचारल तर म्हणतो कर्ज

 काढून घेतलाय..!! "


सगळं सांगून झाल्यावर मी

 थोडा वेळ थांबलो.


नंतर म्हणालो ...

" आता तुमचं म्हणणं आहे की 

त्याने घेतलेल्या मिळकती वर 

स्टे लावायचा ? 


तो पटकन म्हणाला; 

हो बरोबर... 


मी म्हणलं; 

स्टे लावता येईल. 

भावाने खरेदी केलेल्या मिळकती

मधला हिस्सा पण मिळेल.

 पण......


पण तुंम्ही दिलेली कीडनी परत 

मिळणार नाही. 

तुम्ही भावासाठी आटवलेलं

 रक्त परत मिळणार नाही.

 तुंम्ही त्याच्या साठी खर्च केलेलं

 आयुष्य पण परत मिळणार नाही..

आणि मला वाटतयं या

 गोष्टी पुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची

 किंमत शुन्य आहे.

त्याची नियत बदलली.

 तो त्याच्या वाटंनं गेला.

 तुंम्ही त्याच वाटेनं नको जाऊसा.

 तो भिकारी निघाला..

तुंम्ही दिलदार होता..

 दिलदारच रहा.. 

तुम्हाला काहीएक कमी

 पडणार नाही.. !!

उलट मी म्हणेन वडीलो पार्जित

 मिळकती मधला तुमचा हिस्सा 

तेवढा पेरा.. त्याचा हिस्सा पडीक

 राहु द्या.. 

कोर्ट कचेरी करण्या पेक्षा मुलांना 

शिकवा.. शिकुन तुमचा भाऊ

 बिघडला ; 

म्हणुन पोरं बिघडणार नाहीत.. !! "


त्यान १० मिनीटं विचार केला.. 

सगळी कागद पिशवीत कोंबली.. 

डोळं पुसत म्हणाला;

"  चलतो सायेब... !! "


या गोष्टीला ५ वर्ष झाली.

 परवा तो पक्षकार अचानक 

ऑफीस ला आला.

 बरोबर गोरागोमटा पोरगा.

 हातात कसली तरी पिशवी.

मी म्हटले बसा..

तो म्हणाला ,

 "" बसायला न्हाय आलो सायेब, 

पेढं द्यायला आलोय "".


हा माझा पोरगा.

 न्युझिलॅंन्डला असतो.

 काल आलाय.

 आता गावात ३ मजली घर हाय.

 ८-९ एकर शेत घेतलय.

 तुंम्ही म्हणाला होता कोर्ट

 कचेरी च्या वाटला लागु नका. 


मी पोरांच्या शिक्षणा ची

 वाट धरली.. !! "


मला भरुन आलं... 


हातातला पेढा हातातच राहीला..


 .    ..  ."


रागाला योग्य दिशा दिली तर

 पुन्हा रागवायची वेळ

 येणार नाही...


*कितीही कमवा*

            *पण कधी गर्व करू नका*

    *कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर* 

                  *ऱाजा आणि शिपाई*

     *शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात,*

            *आयुष्य खूप सुंदर आहे*

    *एकमेकांना समजून घ्या व जीव लावा*

..

तुम्हाला जर कथा आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये कळवा व शेअर करा...


   *कथा माझी नाही पण खरच प्रेरणा दायक आहे़, म्हणून पाठवली कशी वाटली ?................*

सुंदर लेख, हार्दिक आभार!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट