आज दिनांक १६/०१/२०२१ रोजी नोकरीला बारा वर्षे पूर्ण झाली. देवगड (सिंधुदुर्ग)ते सातारा बारा वर्षाचा प्रवास मला खूप काही अनुभव देणारा आहे. या बारा वर्षाच्या कालावधीत नवनवीन शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.या बारा वर्षात मला अनेक नवनवीन मित्र ,सहकारी, मार्गदर्शक, अधिकारी, यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले तसेच त्यांनी संकट काळात मदत ही केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. इथून पुढे असेच मार्गदर्शन मिळत राहो हीच विनंती. इथून पुढे माझ्या विद्यार्थ्यांना मला नवनवीन प्रयोग करून गुणवत्ता पूर्ण व सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. या कालावधीमध्ये मी शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले त्यामध्ये वनभोजन , क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन , सांस्कृतिक कार्यक्रम ,परिसर भेट, सहल ,पर्यावरण वाचवा ,व्यसनमुक्ती, संगणक साक्षरता, इंटरनेट वापर, परसबाग, शाळा आठवडा बाजार, वृक्षारोपण, स्पर्धा परीक्षा, फनी गेम्स अशा अनेक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ ,कलागुणांना वाव तसेच सर्वांगीण विकासास मदत झाली .अनेक स्पर्धा प्रकारात आम्ही जिल्हास्तर ,तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवण्यात यशस्वी झालो. तसेच समाजाच्या सहकार्यातून शाळेला आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू ,पुस्तके ,संगणक , अशा विविध बाबी शैक्षणिक उठावातून शाळेला प्राप्त करून दिल्या. पणदूर, डिगस ,कुडाळ, कणकवली, वैभववाडी देवगड ,तळेबाजार, रहाटेश्वर गढीताम्हणे, पावणाई ,कालवी, तळेरे, वैभववाडी, महाबळेश्वर बामणोली ,दरेतांब गाढवली, तापोळा ,कोरेगाव सातारा गावातील लोकांचा नोकरी निमित्त संपर्क आला. खूप प्रेमळ, दयाळू, मदत करणारे फणसाच्या गऱ्यासारखी सारखी गोड असणारी माणसं कायम स्मरणात राहतील. इथून पुढे ही माझ्या हातून चांगले शैक्षणिक कार्य व्हावे हाच माझा प्रामाणिक प्रयत्न राहील !!! धन्यवाद . 🙏🙏🙏
लेबल
- चालू घडामोडी current knowledge (38)
- जनरल नॉलेज (39)
- परीक्षा exam (15)
- प्रेरणादायी लेख (60)
- बोधकथा (14)
- महान व्यक्ती (special person) (62)
- महाराष्ट्रातील जिल्हे (29)
- विशेष प्रश्नमंजुषा (27)
- शासन निर्णय gr (45)
- शिक्षक दिन भाषण (4)
- शिक्षण विस्तार अधिकारी/केंद्रप्रमुख परीक्षा (112)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा टेस्ट (61)
- सामान्य ज्ञान टेस्ट (2)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा (50)
- स्कॉलरशिप परीक्षा (20)
- स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट आठवी (13)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट (27)
blog html
शनिवार, १६ जानेवारी, २०२१
शिक्षण सेवेची १२ वर्ष
आज दिनांक १६/०१/२०२१ रोजी नोकरीला बारा वर्षे पूर्ण झाली. देवगड (सिंधुदुर्ग)ते सातारा बारा वर्षाचा प्रवास मला खूप काही अनुभव देणारा आहे. या बारा वर्षाच्या कालावधीत नवनवीन शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.या बारा वर्षात मला अनेक नवनवीन मित्र ,सहकारी, मार्गदर्शक, अधिकारी, यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले तसेच त्यांनी संकट काळात मदत ही केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. इथून पुढे असेच मार्गदर्शन मिळत राहो हीच विनंती. इथून पुढे माझ्या विद्यार्थ्यांना मला नवनवीन प्रयोग करून गुणवत्ता पूर्ण व सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. या कालावधीमध्ये मी शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले त्यामध्ये वनभोजन , क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन , सांस्कृतिक कार्यक्रम ,परिसर भेट, सहल ,पर्यावरण वाचवा ,व्यसनमुक्ती, संगणक साक्षरता, इंटरनेट वापर, परसबाग, शाळा आठवडा बाजार, वृक्षारोपण, स्पर्धा परीक्षा, फनी गेम्स अशा अनेक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ ,कलागुणांना वाव तसेच सर्वांगीण विकासास मदत झाली .अनेक स्पर्धा प्रकारात आम्ही जिल्हास्तर ,तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवण्यात यशस्वी झालो. तसेच समाजाच्या सहकार्यातून शाळेला आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू ,पुस्तके ,संगणक , अशा विविध बाबी शैक्षणिक उठावातून शाळेला प्राप्त करून दिल्या. पणदूर, डिगस ,कुडाळ, कणकवली, वैभववाडी देवगड ,तळेबाजार, रहाटेश्वर गढीताम्हणे, पावणाई ,कालवी, तळेरे, वैभववाडी, महाबळेश्वर बामणोली ,दरेतांब गाढवली, तापोळा ,कोरेगाव सातारा गावातील लोकांचा नोकरी निमित्त संपर्क आला. खूप प्रेमळ, दयाळू, मदत करणारे फणसाच्या गऱ्यासारखी सारखी गोड असणारी माणसं कायम स्मरणात राहतील. इथून पुढे ही माझ्या हातून चांगले शैक्षणिक कार्य व्हावे हाच माझा प्रामाणिक प्रयत्न राहील !!! धन्यवाद . 🙏🙏🙏
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लोकप्रिय पोस्ट
-
टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा Loading…
-
परीक्षेला येणारे हमखास व अचूक प्रश्न Loading…
-
हमखास यश मिळणारच... परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त प्रश्न टेस्ट सोडवा अधिक माहितीसाठी www.vkbeducation.com ला भेट द्या.🙏🙏🙏 Loa...
-
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा आकर्षक प्रमाणपत्र मिळवा 🙏🙏🙏 Loading…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏