मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

शनिवार, २६ एप्रिल, २०२५

TAIT exam 2025 ...

 IBPS Third TAIT 2025


*शिक्षक भरतीची प्रतीक्षा संपली, तिसरी TAIT परीक्षा 24 मे 2025 पासून ऑनलाइन होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2025, जाणून घ्या परीक्षेचा अभ्यासक्रम, IBPS परीक्षा पद्धती व संदर्भ*


 ✅ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने  तिसरी TAIT 2025 परीक्षेचे वेळापत्रक वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे.


✅ IBPS कंपनी कडून तिसरी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी" (TAIT 2025) घेतली जाणार आहे.


🎯 TAIT  परीक्षा  जाहिरात लिंक - https://www.mscepune.in/


*🛑ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक -* https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/



शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती निकाल जाहीर 2025..

 शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून खालील वेबसाईटवर क्लिक करा सीट नंबर टाका व आपला निकाल पहा 

 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन🌹🌹💐💐

लिंक 

https://2025.puppssmsce.in/

त्या लिंक वर क्लिक करा उजव्या बाजूला शिष्यवृत्ती अंतिम निकाल या आयकॉनवर क्लिक करा सीट नंबर टाका व आपल्या रिझल्ट पहा 

शाळेच्या लॉगिनला सुद्धा निकाल उपलब्ध आहे..

धन्यवाद

स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव वीर

 किसन वीर (किसन महादेव वीर) हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण स्वातंत्र्यसेनानी होते. ते केवळ एक स्वातंत्र्य सैनिकच नव्हते, तर एक समर्पित समाजसेवक देखील होते, ज्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी कार्य केले.

त्यांच्या योगदानाचा आढावा:

एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून:

 * भारत छोडो आंदोलन (Quit India Movement): १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात किसन वीर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

 * भूमिगत चळवळ: बापू कचरे यांच्यासोबत त्यांनी सातारा जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या 'उत्तर गटा'चे नेतृत्व केले आणि ब्रिटिश प्रशासनाविरुद्ध तोडफोड आणि इतर भूमिगत कारवायांचे आयोजन केले. यामध्ये सरकारी नोंदी नष्ट करणे आणि बेकायदेशीर दारूभट्टी बंद करणे यासारख्या गोष्टींचा समावेश होता.

 * जेलमधून सुटका: त्यांना अटक झाली होती, परंतु नोव्हेंबर १९४२ मध्ये त्यांनी येरवडा जेलमधून धाडसीरित्या पलायन केले.

 * भूमिगत चळवळीचे संचालक: १९४४ ते १९४६ पर्यंत त्यांनी सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीचे संचालन केले.

 * प्रतिसरकार (Parallel Government): वाई, सातारा आणि कोरेगाव तालुक्यांमध्ये समांतर सरकार स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले.

 * सातारा जिल्हा राष्ट्रीय लीग: १९४४ मध्ये भूमिगत चळवळीला संघटित करण्यासाठी स्थापन झालेल्या सातारा जिल्हा राष्ट्रीय लीगचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले.

 * गव्हर्नरवर हल्ला करण्याचा प्रयत्न: तत्कालीन मुंबईच्या गव्हर्नरला धाक दाखवण्यासाठी त्यांनी सातारा रोड पासवर बॉम्ब ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता.

एक समाजसेवक म्हणून:

 * शेतकऱ्यांचे उत्थान: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, किसन वीर यांनी आपले लक्ष शेतकऱ्यांच्या कल्याणावर केंद्रित केले.

 * शेतकरी संघ: १९५२ मध्ये त्यांनी शेतकरी संघाची स्थापना केली, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना संघटित करणे आणि आधुनिक कृषी पद्धतींना प्रोत्साहन देणे हा होता. सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे ध्येय होते.

 * कृषी उत्पन्न बाजार समिती: त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले, ज्या अंतर्गत सहकारी संस्थांचा विस्तार झाला आणि वाई, सुरूर, आटिट आणि वडूज यांसारख्या ठिकाणी बाजारपेठांची स्थापना झाली.

 * जिल्हा मध्यवर्ती बँक: जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि १९६६ पासून मृत्यूपर्यंत ते त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी भूविकाससाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवले.

 * शिक्षण: १९६० मध्ये त्यांनी यशवंत शिक्षण संस्थेची स्थापना केली, ज्याद्वारे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे. याच वर्षी त्यांनी वाई येथे कॉलेजची स्थापना केली.

 * दुष्काळ निवारण: १९५५ मध्ये सातारा जिल्ह्यात आलेल्या दुष्काळात त्यांनी सातारा जिल्हा दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्षपद भूषवले आणि लोकांच्या कल्याणासाठी विविध राजकीय गटांसोबत काम करण्याची क्षमता दर्शविली.

 * सामाजिक सलोखा: महात्मा गांधींच्या हत्येनंतर समाजात अशांतता निर्माण झाली असताना, किसन वीर यांनी शांतता राखण्यासाठी आणि संघर्ष मिटवण्यासाठी प्रयत्न केले.

किसन वीर यांचे एक निर्भीड स्वातंत्र्य सैनिक आणि एक समर्पित समाजसेवक म्हणून असलेले योगदान सातारा जिल्हा आणि तेथील लोकांसाठी कायम स्मरणात राहील. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे शौर्य आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व शिक्षणाच्या विकासासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. वाई येथील किसन वीर महाविद्यालय आणि किसनवीरनगर येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना यांसारख्या संस्था त्यांच्या नावावर आहेत, जे त्यांच्या महत्त्वपूर्ण वारसाची साक्ष देतात.


गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

बिरदेव ची चित्तर कथा... प्रेरणादायी

 

मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा बिरदेव साहेब..🌹🌹👍👍💐💐





UPSC चा RESULT आणी IAS / IPS झालेल्या 

बिरदेव ची चित्तर कथा,

नुकताच युपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला. देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्व पणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली. कुणी IAS तर कुणी  IPS तर कुणी इतर पदे मेरिटनुसार पटकावली. यातच बिरदेव डोणे 551 व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि IPS पदाला त्याने गवसणी घातली.बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका  मेंढपाळाचा मुलगा.जात्याच हुशार पण घरची परिस्थिती नाजूक. माझा (डॉ राजेंद्र चोपडे)पुतण्या प्रांजल ला coep ला दोन वर्षे ज्युनिअर, सिव्हिल इंजिनिअरिंग चा विद्यार्थी. मुले बिरदेव ची चेष्टा करायची. प्रांजल ने अवतार पाहूनच ओळखला, हा आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीचा असणार, आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्रीच झाली. बिरदेव ला ही पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटलं ह्याचं हायसं वाटलं. सिनिअर्स चा त्रास कमी होण्यासाठी बिरदेव प्रांजल ला चिकटून राहू लागला. दोघांची चांगली गट्टी झाली. प्रांजलने इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. पुढे बिरदेव ही सिव्हिल इंजिनिअर झाला आणि त्यानेही स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जाण्याचे ठरवले. नोकरीच्या मागे न लागता बिरदेव ह्या परीक्षेच्या बेभरवशी आणि खडतर मार्गावरून चालू लागला.या कठीण प्रवासात सीओई पी मध्येच शिकणाऱ्या अक्षय सोलनकर याचीही बिरदेव ला वेळोवेळी सगळ्या प्रकारची मदत झाली.प्रांजल दोन वर्षांपूर्वी सिलेक्ट झाला. बिरदेव चा यशाचा शोध चालूच होता. तो आज संपला. आज दुपारी युपीएससी चा निकाल आला. प्रांजलने यादीत बिरदेव चे नाव शोधले. 551 व्या क्रमांकावर बिरदेव चे नाव दिसल्यावर बिरदेव ला बातमी देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी फोन लावला. तर बिरदेव भर उन्हात मेंढरे चरायला घेउन माळावर गेलेला. तू का मेंढरे घेउन गेलास विचारले असता वडील आजारी असल्याने मीच सध्या मेंढरे घेउन जातोय, बिरदेव उत्तरला. बिरदेव च्या वडिलांचे किडनी च्या मुतखड्याचे ऑपरेशन दोन महिन्यापूर्वी झालेले. पैशाची ओढाताण असल्याने बिरदेव ने प्रशिक्षण चालू असलेल्या प्रांजल आणि दुसरा कोल्हापूर चाच मित्र आशिष पाटील (IAS) या दोघांना मदतीसाठी फोन केला होता. आशिषची कोल्हापूरचा असल्यामुळे त्याच्या ओळखीने तेथील खाजगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ऑपरेशन ची सोय केली होती. ऑपरेशन झाले पण काहीतरी complication झाले (बिरदेव च्या भाषेत ऑपरेशन बिघडले).  तर वडील आजारी असल्याने आमचा हा आय पी एस निकाल लागला त्यादिवशी त्यामुळे मेंढरे घेउन माळावर चारत होता. असा हा बिरदेव चा आय पी एस पर्यंतचा प्रवास.

जाता जाता बिरदेव चा एक किस्सा सांगितला पाहिजे. दुष्काळात तेरावा महिना तसा बिरदेव चा मोबाईल काही दिवसांपूर्वी पुण्यात हरवला. बिरदेव पोलीस तक्रार द्यावी म्हणून पोलिसात गेला. पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली. बिरदेव ने  प्रशिक्षणाला गेलेल्या मित्रांच्या मदतीने पोलीस तक्रार नोंदवली. तक्रार घ्यायलाच टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तक्रार घेतली पण अजून फोन काही सापडला नाही. बिरदेव अधूनमधून फोन सापडला का विचारायला पोलीस स्टेशनला जात होता, तेव्हा तपास चालू आहे, सापडला की कळवू हे ठराविक साच्याचे उत्तर बिरदेव ला मिळत होते. हाच बिरदेव आज भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेला आहे. स्वतः भोगलेल्या हालअपेष्टा आणि उपेक्षा आणि उपसलेले कष्ट यांची जाणीव ठेऊन तो देशसेवा करेल याबाबत मनात तीळमात्र शंका नाही.

डॉ राजेंद्र चोपडे जळोची बारामती.

गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी बाबत

 

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नव्या धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी, इंग्रजीबरोबरच हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे.



नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषासंवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इयत्ता १ ते ५ मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील.

अशी होणार अंमलबजावणी

२०२५-२६ इयत्ता १

२०२६-२७ इयत्ता २, ३, ४ आणि ६

२०२७-२८ इयत्ता ५, ७, ९ आणि ११

२०२८-२९ इयत्ता ८, १० आणि १२

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यापुढे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तराऐवजी पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरण्यात येणार आहेत.

पारंपरिक १०-२-३ ऐवजी ५-३-३-४ रचना

पायाभूत स्तर : वय ३ ते ८ वर्ष - बालवाटिका - १, २, ३, तसेच इयत्ता पहिली व दुसरी

पूर्वतयारी स्तर : वय ८ ते ११ वर्ष - इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी

पूर्व माध्यमिक स्तर : वय ११ ते १४ - इयत्ता सहावी, सातवी व आठवी

माध्यमिक स्तर : वय १४ ते १८ - इयत्ता नववी ते बारावी

नव्या धोरणानुसार १०+२+३ ऐवजी आता ५+३+३+४ असा शैक्षणिक आकृतिबंध


लोकप्रिय पोस्ट